पूर्व नेपाळमध्ये विटभट्टीतील चिमणी कोसळून झालेल्या अपघातात सहा भारतीयांसह ८ जण ठार झाले. सोमवारी इताहारी शहरातील जया नेपाळ ब्रिक फॅक्टरी येथे ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये ४ बालकांचाही समावेश आहे. ठार झालेले सर्व भारतीय कामगार बिहारचे आहेत.
२३ मजूर जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. १०५ फुट उंच असलेली ही चिमणी स्फोटामुळे कोसळली.