शिर्डी पदयात्रींना भरधाव कारनं उडवलं; एकाचा मृत्यू, 4 जखमी

शिर्डी पदयात्रींना भरधाव कारनं उडवलं; एकाचा मृत्यू, 4 जखमी

शिर्डी पदयात्रेसाठी निघालेल्या सुधीर कलप या 23 वर्षीय युवकाला भिवंडीजवळ स्विफ्ट गाडीनं उडवल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी 4 भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबईतील मालाड येथील कुरार भागातून ओम साई ग्रुप पालखी पदयात्री सेवा संघाचे 100 साईभक्त शिर्डीसाठी 100 पदयात्रेला निघाले होते. त्याचवेळी नाशिक महामार्गावरून शिर्डीकडे जात असताना भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस स्टेशन क्षेत्रातील  कुकसे भोईर पाडा या गावांच्या हद्दीतून हे साई भक्त पायी चालले असताना हा अपघात झाला.

अपघातात सुधीर कलप या २३ वर्षीय युवकाचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास भिवंडी येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
पडघा पोलीस स्टेशन येथे निष्काळजीपणे वाहन चालवून अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अपघात करणाऱ्या MH – २०-CS – ९००२ या कारचा चालक कार रस्त्यावर सोडून फरार झाला  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *