दिल्लीत दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

देशात दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी दोन संशयित दहशतवाद्यांना बुधवारी सकाळी अटक केली. हे दोघेही उत्तर प्रदेशातील संभलमधील राहणारे आहेत. हे दोघेही अल कायदाशी संबंधित असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाही. पुढील आठवड्यातील नाताळचा सण आणि त्यानंतर नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट या संशयित दहशतवाद्यांकडून रचला जात होता. गुप्तचर यंत्रणांकडून याची माहिती मिळाल्यावर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या दोघांवर कारवाई करीत त्यांना अटक केली. या दोघांनीही दहशतवादी हल्ल्यांचे पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *