केस कापले नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना दंड आणि उठाबशा काढायला लावल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमधील एका कॉन्व्हेंट शाळेत घडली आहे. संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांचे नाव या शाळेतून काढले असून, अशी भयावह शिक्षा देणाऱ्या शाळेविरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे तर शाळा प्रशसनाणे या प्रकरणी संबंधित शिक्षकांविरोधात कारवाई करनार असल्याचे स्पष्ट केले आहे .
उल्हासनगरमधील होली फॅमिली कॉन्व्हेंट शाळेत उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकारानंतर पालक वर्गात एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगरमधील संभाजी चौक परिसरात राहणारे विजय वाटवाणी यांचा मुलगा देवेश हा फॅमिली कॉन्व्हेंट शाळेत नववी इयत्तेत शिकतो. विजय यांनी शाळा प्रशासनाकडून नेहमीच त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. इतकेच नव्हे, तर मुलांना कधी दंड आकारला जातो कधी मारहाण तर कधी उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जात असल्याचा आरोप वाटवानी यांनी केला आहे.
बुधवारी देवेशच्या वर्गात ज्या विद्यार्थ्यांचे केस वाढलेले आहेत, त्यांना चक्क 70 उठा बशा काढण्याचे फर्मान शाळेने काढले. वाटवानी यांचा मुलगा देवेशलाही ही शिक्षा सुनवल्याने तो आजारी पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टर न त्याला आराम करण्यास सांगितले आहे. या घटनेमुळे धास्तावलेल्या वाटवानी यांनी देवेश या शाळेतून काढून टाकले आहे. तसेच या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात शाळा प्राशासनाविरोधात तक्रार नोंदवली असून कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणी शाळा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरु केली असून संबंधित शिक्षकावर कारवाई केली आहे, अशी माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे.