शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटात राहिला धागा

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात प्रसूतीनंतरची शस्त्रक्रिया करत असताना, डॉक्टरांकडून बॅन्डेजचे धागे आत राहिले. त्या धाग्यांची गाठ होऊन महिलेला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. पोटदुखीने बेजार झालेली महिला पुन्हा रुग्णालयात आली, त्यावेळी तपासणीत विसरभोळ्या डॉक्टरांचा प्रताप उघडकीस आला.
तलत शेख ही महिला ५ ऑक्टोबरला वायसीएम रुग्णालयात दुसर्‍या प्रसूतीसाठी दाखल झाली. शस्त्रक्रियेनंतर तिला घरी सोडले. त्यानंतर पोटात दुखू लागले. त्यामुळे १३ ऑक्टोबरला ही महिला पुन्हा रुग्णालयात आली. तिची तपासणी केली असता, पोटात काहीतरी गाठ असल्याचे आढळून आले. डॉ. नितीन देशपांडे यांनी महिलेच्या पोटातील गाठ शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढली.
गाठ कशामुळे झाली? याचा शोध घेतला असता, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. बॅन्डेजचे दोरे आत ठेवून डॉक्टरांनी टाके घातले होते. बॅन्डेजच्या दोर्‍यांची गाठ तयार झाली. त्यातून संसर्ग होऊन तिच्या पोटात दुखू लागले. डॉक्टरांनी केलेल्या चुकीमुळे महिलेला त्रास झाला. वेळीच ही बाब निदर्शनास आली म्हणून तिचा जीव वाचला. या प्रकारामुळे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *