छत्तीसगडमध्ये दोन माओवादी अटकेत

छत्तीसगडमध्ये दोन माओवादी अटकेत

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा भागातून दोन माओवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या दोन्ही माओवाद्यांवर एक-एक लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

मांडवी मंगडू आणि हपका राजू, अशी अटक केलेल्या माओवाद्यांची नावे आहेत. दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून या माओवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती दंतेवाडा जिल्हा पोलिसांनी दिली.

यातील मांडवी मंगडू याचा २०११ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी पोलीस पथकावरील हल्ला, रेल्वे मार्ग उखडणे, शस्त्रसाठा लुटणे आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्हय़ांमध्ये सहभाग आहे. तर हपका राजूवर पोलीस पथकावर हल्ला करणे, शस्त्रसाठा लुटणे आणि हत्येचा प्रयत्न, अशा गुन्ह्यांची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *