भारत-जपानमध्ये महत्त्वपूर्ण करार

भारत-जपानमध्ये महत्त्वपूर्ण करार

भारत आणि जपान या दोन्ही देशात बुलेट ट्रेन आणि अणुकरारासह अन्य महत्त्वपूर्ण करारावर शनिवारी स्वाक्ष-या करण्यात आल्या. हैदराबाद हाउसमध्ये भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि जपान रेल्वेचे प्रमुख यांनी बुलेट ट्रेन संदर्भातील करारावर स्वाक्ष-या केल्या.

भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. भारताच्या आर्थिक विकासात जपानचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी म्हटले आहे.

भारत आणि जपानमध्ये अणुऊर्जेच्या शांततापुर्ण उपयोगावरही एकमत झाले असून याबाबत सहकार्य करार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान हा भारताच्या विकासात मोठा भागीदार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. भारत आणि जपानमध्ये संयुक्त युध्दाभ्यास होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची लवकरच पुनर्रचना करण्याची गरज असल्याचे मत जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी व्यक्त केले. तसेच मोदींच्या कामाचा वेग स्पीड ट्रेनसारखाच असल्याचे जपानचे पंतप्रधान अबे यांनी नमूद केले.

दरम्यान, यावेळी डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत अणुकराराविरोधात निदर्शने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *