झोपड्यांमध्ये राहणारे लोक गरीब असतात असे समजले जाते. पण हा समज मुंबईतील झोपडपट्ट्यांनी खोटा ठरवलाय.
भारतात अशी जागाही आहे जिथे एका झोपडीची किंमत तब्बल एक कोटी रुपये आहे. धारावी हा परिसर आशियातील दुसरा सर्वात मोठा स्लम परिसर आहे. येथे एका झोपडीची किंमत तब्बल एक कोटी रुपये आहे.
१८८० मध्ये इंग्रजांनी ही वस्ती वसवली होती. सध्याच्या घडीला या परिसरातील लोकसंख्या १० लाखाहूनही अधिक आहे. येथील नागरिक घरातूनच व्यवसाय करतात. करोडोंचा व्यापार येथे चालतो.
धारावी परिसरात मुंबईबाहेरील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. पोटापाण्यासाठी राज्याबाहेरुन आलेल्यांची संख्या धारावीत अधिक आहे.