हेरॉल्ड प्रकरणी राज्यसभा कामकाज तिस-या दिवशीही ठप्प

हेरॉल्ड प्रकरणी राज्यसभा कामकाज तिस-या दिवशीही ठप्प

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सदस्यानी आक्रमक भूमिका कायम ठेवल्याने गुरुवारी तिस-या दिवशीही राज्यसभेत कामकाज होऊ शकले नाही. सरकारच्या विरोधात संतप्त काँग्रेस सदस्यांनी वारंवार घोषणाबाजी केली. त्यामुळे आधी वारंवार कामकाज तहकूब झाले. तरीही गदारोळ चालूच राहिला तेव्हा कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय सभापतींनी दिला.

मोदी तेरी तानाशाही नही चलेगी अशा घोषणा काँग्रेस सदस्य वारंवार देत होते. आक्रमक सदस्यांपुढे सभापती पी.जे. कुरियन यांचे शांततेचे आवाहन केव्हाच वाहून गेले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात मोदी सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस सदस्य करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *