बीफ फेस्टिवलवरून भाजप आमदाराला अटक

उस्मानिया विद्यापीठाच्या परिसरात आज (गुरुवार) बीफ फेस्टिवलचे आयोजन करण्याऱ्या आठ विद्यार्थ्यांसह याला विरोध करणाऱ्या भाजप आमदारालाही अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीफ फेस्टिवलला विरोध करणारे भाजपचे आमदार टी. राजासिंह यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आयोजक आठ विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. विद्यापीठाच्या परिसरात संचारबंदीचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विद्यापीठाच्या आवारातच आज दुसऱ्या एका गटाने डुक्कर मांस फेस्टिवलचे आयोजन केले होते.
 
न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठाच्या आवारात कोणताही अशा प्रकारचा फेस्टिवल आयोजित करण्याची मनाई असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे, पोलिसांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *