बेकायदा शस्त्र वाळगल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेला सिनेअभिनेता संजय दत्त याची सुटका होणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
संजय दत्तच्या सुटकेबाबत गृहमंत्रालयाकडे कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळं त्याच्या सुटकेचा प्रश्नच नसल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय. संजय दत्त याची मार्चमध्येच सुटका होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.