कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोकोस सुरुवात केली आहे. लासलगावात आधी शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला. त्यानंतर आता रास्ता रोकोस सुरुवात झाली.
कांद्याचे निर्यातमूल्य कमी न केल्यानं नाशिकच्या कांदा निर्यातदारांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. यामुळं स्थानिक बाजारात शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय.
सरकारनं कांद्यावर ७०० डॉलरचं निर्यातमूल्य लावलं आहे. यामुळं कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. याचा मोठा फटका कांदा निर्यातदारांना बसतोय.
हे निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी कांदा निर्यातदारांनी केली होती. मात्र यावर सरकारनं काहीही निर्णय घेतलेला नाही. यापुढंही कांदा निर्यातदार लिलावात सहभागी झाले नाही तर कांद्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे.