अब्जावधींचा खजिना असलेलं 307 वर्षे जुनं जहाज सापडलं!

अब्जावधींचा खजिना असलेलं 307 वर्षे जुनं जहाज सापडलं!

कोलंबियामध्ये खजिन्याने भरलेलं स्पेनचं ऐतिहासिक जहाज सापडलं आहे. अब्जावधी डॉलरचं हे असण्याची शक्यता आहे.

कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी ट्विटरवरुन खजिन्याने भरलेलं जहाज मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. “सेन जोस हे एक जुनं जहाज सापडलं आहे. या जहाजाबाबतची अधिक माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली जाईल.”, असे कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी माहिती दिली.

1708 साली ‘स्पॅनिश उत्तराधिकार युद्धा’दरम्यान हे जहाज ब्रिटनच्या जहाजांनी बुडवलं होतं. असं म्हटलं जातं की, हे जहाज सोनं आणि चांदीच्या नाण्यांनी भरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *