लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रियकराला कॅफेत नेले; चुंबन घेतलं, 21 वर्षीय तरुणीवर ‘पोक्सो’ दाखल

पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातून अल्पवयीन मुलाशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन प्रियकराला कॅफेमध्ये नेले आणि त्याचे चुंबन घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलाचे एका २१ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. या तरुणीने अल्पवयीन मुलाला लग्नाचे आमिष दाखवून त्याला तळेगाव दाभाडे परिसरातील एका कॅफेमध्ये नेले. कॅफेमध्ये असताना तरुणीने अल्पवयीन मुलाचे चुंबन घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *