मोदी उभारतील भव्य राम मंदिर – तोगडिया

मोदी उभारतील भव्य राम मंदिर – तोगडिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत भव्य राम मंदिर नक्की उभारतील, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्यवाहक प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केला आहे.
 
भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना तोगडिया यांनी राम मंदिराबाबत वक्तव्य केले. तोगडिया म्हणाले, की अयोध्येत 6 डिसेंबर 1992 मध्ये पाडलेल्या बाबरी मशीदीच्या ठिकाणीच भव्य राम मंदिर उभारण्यात येईल. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार आणि निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भव्य राम मंदिर उभारून कोट्यवधी हिंदू नागरिकांचे स्वप्न मोदी साकार करतील. यासाठी हिंदू नागरिकांनी संतांच्या निर्देशाचे पालन करण्याची तयारी ठेवावी. 
 
सरदार पटेल यांनी ज्याप्रमाणे गुजरातमध्ये सोमनाथ मंदिर उभारले. त्याप्रमाणे अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत विधेयक मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देण्यात आल्याचे तोगडिया यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *