देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने शुक्रवारी ग्राहकांसाठी ऑनलाईन सुविधेची घोषणा केली. या सुविधेच्या माध्यमातून गृह, मोटार, शैक्षणिक आणि वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी यासाठी अॅप्लिकेशन लाँच केले. ज्या माध्यमातून ग्राहकांना पात्रता आणि आवश्यकता नोंदवता येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
ऑनलाईन फॉर्म जमा करताच ग्राहकांना यामध्ये ताबडतोब ई-पोच प्राप्त होईल. त्यानंतर बँकेचे अधिकारी ग्राहकांशी संपर्क साधून कर्जासंबंधीची औपचारिका पार पाडतील. यामध्ये ग्राहकांना आवश्यक कागदपत्रेही ऑनलाईन जोडता येणार आहेत.
यामुळे कर्ज प्रोसेसिंगचा वेळ कमी होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. लवकरच बँकेकडून मोबाईल अॅपही दाखल केले जाणार आहे.