मोदी आमचे सर्वांत मोठे शत्रू – इसिस

मोदी आमचे सर्वांत मोठे शत्रू – इसिस

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिमविरोधी असून ते आमचे सर्वांत मोठे शत्रू असल्याचे ‘इसिस‘ या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे. ‘ब्लॅक फ्लॅग्ज्‌ फ्रॉम इस्लामिक स्टेट‘ नावाने प्रकाशित करण्यात आलेल्या ई-बुकमध्ये मोदींवर आरोप करण्यात आले आहेत.

पुस्तकात पुढे म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदी हे हिंदू राष्ट्रवादी असून ते हत्यारांची पूजा करतात. भविष्यात मुस्लिमांच्या विरोधात लढा देण्यासाठी माणसं तयार करतात. ते आमचे सर्वांत मोठे शत्रू आहेत.‘ आम्ही सीरियाबाहेर पडून भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानसह अन्य काही देशांमध्ये घुसणार असल्याचा इशाराही ‘इसिस‘ने दिला आहे. दादरी प्रकरणाचीही ‘इसिस‘ने दखल घेतली असून भारतातील राजकीय परिस्थितीवर टीका केली आहे. पुस्तकामध्ये मोदी यांना ‘प्राईम मिनिस्टर‘ऐवजी भारताचे “प्रेसिडेंट‘ म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *