दिलीप वेंगसरकर यांची एनसीएच्या प्रमुखपदी नियुक्ती

दिलीप वेंगसरकर यांची एनसीएच्या प्रमुखपदी नियुक्ती

भारताचे माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी ही घोषणा केली.

मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बीसीसीआयचे नवे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी कॉन्फ्लिक्‍ट ऑफ इंटरेस्टवर कडक धोरण स्वीकारल्यानंतर बृजेश पटेल यांनी हे पद सोडले. त्यानंतर दिलीप वेंगसरकर यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही  सक्षम करणे हे पहिले उद्दीष्ट आहे, असे मत दिलीप वेंगसरकर यानी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *