‘प्रेम रतन धन पायो’ची अवघ्या 14 दिवसात 200 कोटीची कमाई

‘प्रेम रतन धन पायो’ची अवघ्या 14 दिवसात 200 कोटीची कमाई

सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाने अवघ्या 14 दिवसात 200 कोटींचा गल्ला जमलाय. या चित्रपटासह सलमान खानच्या तिसऱ्या चित्रपटाने यंदा 200 कोटी रुपयांची कमाई करण्याची किमया केली आहे.

दिवाळी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक 40 कोटी 35 लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाचा गल्ला 129.77 कोटी रुपयांचा होता. आणि हाही बॉलिवूडमध्ये एक विक्रमच आहे.

दरम्यान, यावर्षी सलमान खानच्या किक आणि बजरंगी भाईजान या चित्रपटांनीही 200 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवलाय. त्यामुळे सलमान म्हणजे 200 कोटी असं एक नवं समिकरण तयार झालेलं पहायला मिळतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *