आता मोबाईलवर १ रुपयांत दोन तास बोला चक्क मोफत

आता मोबाईलवर १ रुपयांत दोन तास बोला चक्क मोफत

मोबाईलवर बोलण्याचा तुम्हाला शौक आहे का, तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. आता तुम्ही १ रुपयांत दोन तास चक्क मोफत बोलू शकता. ही ऑफर मर्यादीत काळासाठी आहे.

एअरसेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर सुरु केली आहे. या योजनेनुसार तुम्ही सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत तुम्ही मोफत कॉल करु शकता.

सकाळच्या या दोन तासांसाठी तुम्हाला केवळ १ रुपया द्यावा लागणार आहे. हे शुल्क पहिल्या कॉलसाठी असणार आहे. त्यानंतर ६ ते ८ दरम्यान केलेल्या कॉल्सवर चार्ज आकारला जाणार नाही.

एअरसेलचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर अनुपम वासुदेव यांनी ही नवी स्कीम लाँच केली आहे. ही योजना विद्यार्थी आणि युवा पिढीला डोळ्यासमोर सुरु करण्यात आली आहे, असे ते म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *