श्रीनगरमध्ये ग्रेनेड स्फोटात चार जखमी

दक्षिण काश्मीरमध्ये श्रीनगरपासून २० कि.मी. अंतरावर पामपोरमध्ये झालेल्या स्फोटात सुरक्षा जवानांसह काही जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी कडलाबाल येथे संशयित अतिरेक्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला.

यात ग्रेनेडच्या स्फोटामध्ये चार जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. यात दोन सुरक्षा जवान आहेत. या स्फोटामुळे परिसरात एकच घबराट पसरली. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षापथक पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *