मागच्या महिन्यात इजिप्तच्या सिनाई पेनिनसुला भागात रशियाचे एक प्रवासी विमान कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील सर्व २२४ प्रवासी ठार झाले होते.
हा अपघात नसून घातपात होता आणि आपणच ते विमान पाडले असा दावा इसिसने केला आहे. आपला दावा पटवून देण्यासाठी इसिसने दाबिक या आपल्या अधिकृत नियतकालिकात कॅन बॉम्बचा फोटो प्रसिध्द केला आहे.
एका सॉफ्टड्रिंक कॅनच्या माध्यमातून विमानात बॉम्ब ठेवण्यात आला होता असे इसिसने म्हटले आहे. रशियाही इसिस विरोधातील आघाडीत सहभागी झाली असून, सिरीयामध्ये फ्रान्सच्या बरोबरीने रशियाही इसिसच्या तळांवर हवाई हल्ले करत आहे.
या कारवाईचा बदला म्हणून आपण हे विमान पाडले असे इसिसने म्हटले आहे. इसिसने जे छायाचित्र प्रसिध्द केले आहे. त्यातील वस्तूंवरुन मोठे प्रवासी विमान पाडणे शक्य असल्याचे बॉम्ब तज्ञांनी म्हटले आहे.