हिरॉईनशिवाय सुल्तानचे चित्रीकरण होणार

हिरॉईनशिवाय सुल्तानचे चित्रीकरण होणार

बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान सध्या सुल्तानच्या भूमिकेसाठी जीममध्ये घाम गाळत आहे. सुल्तानमध्ये सलमान एका कुस्तीपटूच्या भूमिकेत असून, पहिलवानासारखी शरीरयष्टी कमावण्यासाठी सलमान सध्या जीममध्ये मेहनत घेत आहे.

सलमानने एकाबाजूला काम सुरु केले असले तरी, दुस-या बाजूला चित्रपटाच्या निर्मिती टीमला मात्र दुसरीच चिंता सतावत आहे. सुल्तान एक स्पोर्टस लव्ह स्टोरीचा चित्रपट आहे. या चित्रपटात दोन नायिका हव्या आहेत.

एका प्रस्थापित चेहरा आणि दुसरी नवोदीत अभिनेत्री. कुठल्या नायिकेला संधी द्यायची यावर सलमान आणि आदित्यमध्ये एकमत होत नसल्यामुळे अद्याप नायिकांची निवड झालेली नाही.

नवोदीत अभिनेत्री निवडण्यासाठी घेतलेल्या ऑडीशनमध्ये एकही चेहरा निर्माता आदित्य चोप्राच्या पसंतीस उतरला नाही. चित्रपटाच्या क्रू ने आता ज्या दृश्यांमध्ये नायिकांची आवश्यकता नाही अशी दृश्ये चित्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या दृश्यांचे चित्रीकरण होईपर्यंत आदित्य आणि सलमान नायिकांची निवड करतील अशी अपेक्षा करुया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *