कानपुरमध्ये चालत्या मोटारीत सामुहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात रविवारी रात्री एका अल्पवयीन मुलीवर चार जणांनी चालत्या मोटारीत सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
 
लखनौ-कानपूर महामार्गावर रविवारी रात्री चार युवकांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून रस्तावर फेकून दिले. कानपुरमधील ओमपुरवा भागात राहत असलेली ही 15 वर्षीय मुलगी आठवीत शिकत आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औषधे आणण्यासाठी गेली असताना तिच्याच घराजवळ राहत असलेल्या शादाब आणि त्याच्या चार मित्रांनी तिचे अपहरण केले. ती बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर शोध घेण्यात आला. तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता आणि तिला उन्नाव रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *