ऐन दिवाळीत कांदा वधारला!

ऐन दिवाळीत कांदा वधारला!

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली. यामुळे भावात वाढ झाली. बटाटयाची आवक वाढून भावही वाढले. जळगाव भुईमूग शेंगा, गवार, शेवगा आवक वाढली आहे.

फळभाज्यांच्या बाजारात हिरव्या मिरचीची आवक घटून भावही घटले. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथीची आवक सहा पटीने, तर कोथिंबिरीची आवक दुपटीने वाढून भाव घटले. जनावरांच्या बाजारात बैल, म्हैस व शेळ्या-मेढय़ांच्या संख्येत वाढ होऊन विक्रीतही वाढ झाली.

कांद्याची आवक १६० क्विंटलने घटली व कांद्याला ८०० ते ४००० रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. बटाटयाची आवक या आठवडयात ३१५ क्विंटलने वाढली. एकूण १०१५ क्विंटल आवक होऊन बटाटयाला या आठवडयात ४०० ते १२०० रुपये असा प्रतिक्विंटलला प्रतवारीनुसार भाव मिळाला.

बाजारात एकूण उलाढाल २ कोटी ६ लाख ९८ हजार रुपये झाली. जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक ११० क्विंटल झाली. त्यांचे भाव ५००० रुपयांवर स्थिरावले.

बंदूक भुईमूग शेंगांची एकूण आवक ५० क्विंटल होऊन कमाल भाव ६५०० रुपयांवरून ७००० रुपयांवर पोहोचले. लसणाची आवक तीन क्विंटल झाली. लसणाला ७०० रुपयांचा कमाल भाव मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *