अश्विनच्या फिरकीची जादू, आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत

अश्विनच्या फिरकीची जादू, आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत

आर अश्विनच्या फिरकीने आफ्रिकेला गुंडाळले असून आफ्रिकेचा निम्मा संघ अवघ्या १२७ धावांमध्येच तंबूत परतला आहे. लंचपर्यंत आफ्रिकेने पाच गडी गमावत १२७ धावा केल्या असून सध्या खेळपट्टीवर एबी डिव्हिलियर्स आणि फिलांडर ही जोडी मैदानात आहे.

मोहाली कसोटीच्या दुस-या दिवशी आफ्रिकेने २ बाद २८ वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. डिन एल्गार आणि हाशिम आमला या जोडीने सावध सुरुवात करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एल्गार ३७ धावांवर असताना अश्विनच्या फिरकीवर तो झेलबाद झाला. तर अश्विनने हाशिम आमलाचा अडसर दूर करत भारताला मोठे यश मिळवून दिले. हामला ४३ धावांवर बाद झाला. यानंतर डेन विलासला स्वस्तात माघारी पाठवण्यात अश्विनला यश आले. लंचपर्यंत ए बी डिव्हिलियर्स नाबाद २६ तर फिलँडर नाबाद २ धावांवर खेळत होता. मोहाली कसोटीत भारताचा पहिला डाव अवघ्या २०१ धावांवर आटोपला असून भारताची सर्व मदार आता गोलंदाजांवर अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *