अक्वान आज ओडिशात धडकणार, ३ लाख नागरिकांचं स्थलांतर, चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधवाड्यानंतर हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात एकीकडे गुलाबी थंडीचा अनुभव येत असताना दुसरीकडे दिवसा उष्ण आणि काही भागात दमट हवामान जाणवत आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत असून, नागरिकांना संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. पहाटेच्या वेळी अनेक भागांत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यात अशाच प्रकारचे हवामान कायम राहण्याचा अंदाज असून आहे. विशेष बाब म्हणजे, या हवामानाचा आता नागरिकांना त्रास देखील होत असल्याचं समोर आलं आहे. नागरिकांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे.

अक्वान चक्रीवादळ निर्माण

गेल्या दीड महिन्यात बंगालच्या उपसागरात तिसरं चक्रीवादळ निर्माण झालं आहे. अर्णब आणि मुरसू या चक्रीवादळानंतर आता अक्वान चक्रीवादळ निर्माण झालं आहे. हे चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत असून आज शुक्रवारी रोजी दुपारपर्यंत ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अक्वान चक्रीवादळाची काल गुरुवारी रात्रीपासून अधिक तीव्रता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार अक्वान हे चक्रीवादळ आज दुपारी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *