पाणीपुरवठ्याची पाइपलाइन जोडून परतताना सरपंचपुत्राचा धरणात बुडून मृत्यू; ४८ वर्षीय मधुकर महाले यांचा अंत

ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पद्मावती धरणात उतरून पाइपलाइन जोडण्याचे काम करून पोहत परतताना सरपंचपुत्राचा बुडून मृत्यू झाला. मासरूळ येथे गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मधुकर गणपत महाले (वय ४८) असे मृताचे नाव आहे.

बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथे शकुंतलाबाई महाले या सरपंच आहेत. ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी मधुकर पुढाकार घेत होते. जवळच असलेल्या पद्मावती धरणाहून गावाला पाणीपुरवठा होतो. धरणाच्या बुडीत क्षेत्रात विहीर खोदण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून जलवाहिनी टाकण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *