कामाची वेळ न पाळणा-या कर्मचा-यांविरोधात एअर इंडिया प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. एअर इंडियाने विमान उड्डाणाची वेळ न पाळणा-या आपल्या सेवेतील १७ हवाई सुंदरींना निलंबित केले आहे.
विमानाचे संचलन करणारा केबिन क्रू चा कर्मचारी वर्ग किती वाजता विमानतळावर येतो यावर एअर इंडियाने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. निलंबित केलेल्या १७ हवाई सुंदरींमुळे तीन पेक्षा जास्त वेळा नियोजित उड्डाणाला विलंब झाल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे एअर इंडियाच्या अधिका-याने सांगितले.
एअर इंडियाने आतापर्यंत २७२ केबिन क्रू कर्मचा-यांवर बेशिस्तीचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केली आहे. कर्मचा-यांची कमतरता तसेच उशिरा येणारे कर्मचारी यामुळे एअर इंडियाच्या विमानाची उड्डाणे विलंबाने सुरु होती. त्यानंतर व्यवस्थापनाने कारवाई सुरु केल्यानंतर ओटीपी ऑन टाईम परफॉमन्समध्ये सुधारणा झाली. आखाती देशामध्ये एअर इंडियाच्या केबिन क्रू ने विश्रांतीसाठी जास्त वेळ घेतला त्यामुळे उड्डाणाला विलंब झाला होता.