17 वर्षांपासून काम अपूर्णच, आता खर्च 5500 कोटींनी वाढला; याच हायवेच्या उद्घाटनाला जाणार नाहीत गडकरी!

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मंजूर झालेला खर्च तब्बल ५,५०० कोटी रुपयांनी वाढल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. ‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशन’चे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून ही आकडेवारी समोर आली. ३५५ किमीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी असलेल्या १० पॅकेजचा मूळ मंजूर खर्च ११,४०९.१४ कोटी रुपये होता. तो आता १६,९०९.२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच खर्चात तब्बल ४८ टक्के वाढ झाली आहे.

केंद्राची मंजुरी मिळून १७ वर्षे उलटली

मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या चौपदरीकरणाला केंद्राची मंजुरी मिळून १७ वर्षे उलटली आहेत. मात्र, प्रकल्पाचा मोठा भाग अद्याप पूर्ण झालेला नाही. मिळालेल्या माहितीच्या आकडेवारीनुसार, चिपळूण-रत्नागिरी परिसरातील परशुराम घाट-आरावली या पॅकेजच्या खर्चात सर्वाधिक वाढ झाली आहे. या पॅकेजसाठी सुरुवातीला ९८३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *