भीषण अपघात! ट्रक आणि पिकअप व्हॅनची जोरदार धडक, 7 जण जागीच ठार

नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि पिकअप व्हॅनची धडक होऊन हा अपघात झाला. अपघात इतका जबर होता की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच चार जण जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

भंडाऱ्यातील पिंपळगाव सडक येथे पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. भाऊ ढाबाजवळ ट्रक आणि पिकअप व्हॅनची जोरदार धडक झाली. धडकेनंतर पिकअप व्हॅनचा अक्षरश: चुराडा झाला. या भीषण अपघातात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी आहेत.  जखमींना  उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरुवात केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *