टाटा मोटर्सच्या जागतिक ब्रँड अॅम्बेसिडरपदी मेस्सीची निवड

टाटा मोटर्सच्या जागतिक ब्रँड अॅम्बेसिडरपदी मेस्सीची निवड

जागतिक सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा चारवेळा मान मिळवणारा अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची भारतीय कंपनी टाटा मोटर्सचा जागतिक ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने मेस्सीसोबत दोन वर्ष मुदतीचा करार केला आहे.

टाटा मोटर्स कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या प्रसिद्धीसाठी मेस्सीची निवड केल्याचे टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष मयांक पारीख यांनी सांगितले. मेस्सीच्या जगभरातील लोकप्रियतेचा कंपनीला निश्चित फायदा होईल, असे ते म्हणाले.

मला भारताविषयी नेहमीच आश्चर्य वाटते. विविधतेने नटलेल्या या देशाविषयी मी अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. मला पहिल्यांदाच एका भारतीय ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे टाटा मोटर्स परिवाराचा सदस्य होण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया मेस्सीने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *