लातुरात धक्कादायक घटना! 45 वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, मोबाईलच्या…

लातूरच्या उदगीरमधील माळेवाडीत 45 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान नातेवाईकांनी आत्महत्येनंतर धक्कादायक दावा केला आहे. ऑनलाइन गेममुळे हा प्रकार झाल्याचा नातेवाईकांचा दावा आहे. यांतर मोबाईल गेम्सचं वाढतं व्यसन पुन्हा चर्चेत आहे. नातेवाईकांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे याची शोध पोलीस घेत आहेत. आत्महत्येमागील नेमक्या कारणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र यामुळे वाढतं मोबाईल गेम्सचं व्यसन ही चिंतेची बाब ठरत असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे.

उदगीर तालुक्यातील माळेवाडी येथे 45 वर्षीय अंबादास माधवराव घंटे यांनी धारदार शस्त्राने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृताच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, अंबादास घंटे यांना गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन मोबाईल गेम्सचं व्यसन लागलं होतं आणि त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. मात्र, आत्महत्येमागील नेमकं कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *