मुंबई लोकलमधून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. लोकलची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी यामुळं प्रवाशांचा मनस्पात वाढत आहे. सकाळच्या वेळेत तर गर्दीत बसायला तर सोडाच पण उभं राहायलादेखील जागा मिळत नाही. अशावेळी लोकलच्या दरवाजात अनेकजण लोक उभे राहतात. पण लोकलच्या दरवाजात उभे राहणाऱ्या लोकांमुळं अनेकदा स्थानकावर उभं असलेल्या प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यास मिळत नाही. त्यामुळं या प्रवाशांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो. या अपघाताची शक्यता असते.
लोकलचे दरवाजे अडवणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई होणार आहे. पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर सहा महिन्याच्या विशेष मोहिमेत 15,589 जणांना दंड आकारण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरील वसई- विरार लोकलचे काही प्रवासी लोकलचा दरवाजा अडवून, प्रवाशांना ये-जा करण्यापासून रोखतात. त्यामुळे प्रवाशांना काहीवेळा इच्छित लोकल पकडता येत नाही.
प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे परिसरातील कायदा व सुव्यवस्था आणि लोकल रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने 1 जानेवारी ते 25 जून 2026 या कालावधीत कारवाई करत 40 लाख 81 हजार 308 रुपयांचा दंड वसूल केले
आरपीएफने रेल्वे अधिनियम कलम 144 अंतर्गत राबविलेल्या बेकायदा फेरीवाले विरोधी मोहिमेत 7,765 प्रकरणे नोंदवून 7,748 जणांना अटक केली आहे. या प्रकरणांत न्यायालयाने 38 लाख 41 हजार 725 रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईत वलसाड 1,315 प्रकरणे, वापी 830, पालघर 774, नंदुरबार 691आणि वसई रोड 621 ही स्थानके आघाडीवर आहेत.
तसेच अंधेरी 288, भाईंदर 197, दादर 179, नालासोपारा 171, मालाड 124, विरार 103, चर्चगेट 47, मुंबई सेंट्रल 5 प्रकरणात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
मध्य रेल्वेवर दुप्पट दंडामुळे तिजोरीत भरमसाट वाढ
मध्य रेल्वेच्या दंडवसुलीत एकूण 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिकीटाविना प्रवास करणाऱ्यांना दुप्पट दंडाचा फटका बसलाय, तर विनातिकीटातून दंड वसुलीत भरमसाट वाढ झाली झाले. मध्य रेल्वेवरील तिकीट तपासणी मोहिमेत प्रकरणांची संख्या किंचित घटल्याचेही स्पष्ट झाले आहे. 1 ते 16 जुलै या कालावधीत विनातिकीट प्रवाशांना पकडण्याच्या प्रकरणांमध्ये सुमारे 4 टक्क्यांनी घट झाली आहे.
मात्र याच कालावधीत दंड वसुलीत सुमारे 61 टक्क्यांची वाढ झाली आहे. सुधारित दरआकारणी सुरू झाल्यापासून 21 जून ते 16 जुलै या कालावधीत या दंडवसुलीच्या प्रमाणात 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1,21,697 विनातिकीट प्रकरणे समोर आली असून 04 टक्क्यांनी घट विनातिकीट प्रवाशांना पकडण्याच्या प्रकरणांत झाली आहे
तिकिटाविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 500 रुपयांचा किमान दंड वसूल केला जात असून 1 ते 16 जुलै 2026 या कालाधीत 74,030 विनातिकीट प्रकरणे आढळली. संबंधितांवर 2 कोटी 97 लाख 94 हजार 124 रुपये दंड आकारण्यात आला.
