26 जुलैची पुन्हा दहशत; पर्वतांपासून मैदानी क्षेत्रापर्यंत मान्सूनचा महाअलर्ट

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असला तरीही उत्तर भारताला मात्र त्यानं काही दिवसांपासून ओढ दिली होती. आता मात्र ही परिस्थिती बदलत असून हवामान बदलत असल्याचं स्पष्ट होत आहे. हिमाचल प्रदेशपासून जम्मू काश्मीरपर्यंत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानं या पावसानं अनेक बळी घेतले आहेत. जीवित आणि वित्ताही मोठी हानी झाली आहे, तर अनेक घर- संसार पाण्याच्या विळख्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये ही परिस्थिती अतिशय भयावह वळणावर आल्याचं पाहायला मिळत आहे. राजौरी, पूंछ, किश्तवाड इथं ढगफुटी झाल्यानं एकाएकी पूरस्तिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं इथं संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. सोमवारी पहाटे साधारण तीन वाजण्याच्या सुमारास राजौरी इथं पूर आला आणि या पुराच्या पाण्यात सारंकाही वाहून गेलं. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पाण्याचा लोंढा इतका मोठा होता की, वाहनांचा चुराडा ाला, 15 फूट उंच लाटा उसलळ्या आणि सोबत सारंकाही घेऊन गेल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *