उबेर टॅक्‍सी बलात्कारप्रकरणातील चालक दोषी

उबेर टॅक्‍सी बलात्कारप्रकरणातील चालक दोषी

दिल्ली तील उबेर टॅक्‍सी बलात्कारप्रकरणातील आरोपी चालक शिवकुमार यादव याला न्यायालयाने आज (मंगळवार) दोषी ठरवले आहे.

पाच डिसेंबर 2014 रोजी टॅक्‍सीमध्ये एका महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयात आज झालेल्या सुनावणी झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी उबेर टॅक्‍सी चालक शिवकुमार यादव याला दोषी ठरवले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी महिला कामावरून घरी परतत असताना टॅक्‍सीमध्ये बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी उबेर टॅक्‍सी चालक शिवकुमार यादव याला सात डिसेंबर 2014 रोजी मथुरा येथून अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *