अंगावर खाकी आणि खांद्यावर स्टार लावून फिरणाऱ्या तोत्या “लेडी सिंघम”ला अटक करण्यात आली आहे. 25 वर्षीय तरुणीला पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन अटक केली.
संबंधित तरुणी पोलीस उपनिरीक्षकांचा गणवेश परिधान करून नागरिकांवर रुबाब दाखवत होती असं सांगण्यात आलं.
प्राथमिक माहितीनुसार एका नामांकित क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट मिळावी म्हणून या तरुणीनं पोलिसांचा गणवेश करत बनाव रचला. समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय 25) असं अटक केलेल्या महिला आरोपीचं नाव आहे. ही कारवाई शनिवार, 6 जून 2026 रोजी पुण्यातील कॅम्प परिसरात करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचं पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं होतं. काही दिवसांपासून ती एक खासगी कंपनीत काम करत होती.
