तेल कंपन्यांकडून ग्राहकांवर ओझं टाकण्यास सुरुवात; 10 दिवसांत तिसऱ्यांदा वाढवले पेट्रोल, डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. मागील 10 दिवसांच्या आत तिसऱ्यांदा इंधनाच्या दरात ही वाढ झाली आहे. शनिवारपासून पेट्रोलच्या दरात 87 पैशांनी, तर डिझेलच्या दरात 91 पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोलचा दर आता 99.51 रुपये प्रति लिटर झाला असून, डिझेलचा दर 92.49 रुपये प्रति लिटर इतका आहे.

15 मे पासून इंधनाच्या दरांमध्ये झालेली ही तिसरी वाढ आहे. 15 मे रोजीच सरकारी तेल कंपन्यांनी, मध्य-पूर्वेकडील संघर्षामुळे वाढलेल्या ऊर्जेच्या किमतींचा बोजा टप्प्याटप्प्याने ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली होती. 15 मे रोजी दरांमध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती, आणि त्यानंतर 19 मे रोजी 90 पैशांची वाढ झाली. एकूणच, आतापर्यंत इंधनाच्या दरांमध्ये प्रति लिटर जवळपास 5 रुपयांची वाढ झाली आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने, अफवा फेटाळत भारतात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याचे आश्वासन दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही दरवाढ झाली आहे. “देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता असून पुरवठा स्थिर आहे. नागरिकांना घाबरून खरेदी करणे टाळण्याचा आणि केवळ प्रत्यक्ष गरजेनुसारच इंधन खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तेल विपणन कंपन्यांद्वारे पुरवठ्यावर सतत देखरेख ठेवून आणि समन्वित वितरण प्रयत्नांच्या माध्यमातून काही किरकोळ विक्री केंद्रांवरील तात्पुरता ताण कमी केला जात आहे,” असं मंत्रालयाने सोशल मीडियावरुन सांगितलं आहे.

कोणत्या शहरात किती दर

दिल्ली
पेट्रोल: 99.51 रुपये (+0.87)
डिझेल: 92.49 रुपये (+0.91)

कोलकाता
पेट्रोल: 110.57 रुपये (+0.87)
डिझेल: 96.04 रुपये  (+0.91)

मुंबई
पेट्रोल: 107.56 रुपये (+0.87)
डिझेल: 94.05 रुपये (+0.91)

चेन्नई
पेट्रोल: 104.54 रुपये (+0.87)
डिझेल: 96.16 रुपये (+0.91)

गुरुग्राम
पेट्रोल: 100.38 रुपये (+0.87)
डिझेल: 92.92 रुपये (0.91)

नोएडा
पेट्रोल: 98.78 रुपये (0.87)
डिझेल: 93.12 रुपये (0.91)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *