इस्त्रोचा वैज्ञानिक निघाला दहावी पास मजूर, ‘लखोबा लोखंडे’कडून महिलांना लाखोंचा गंडा

लग्नासाठी हल्ली मॅट्रिमोनिअल वेबसाईट सर्रास वापरल्या जातात. पण योग्य ती खातरजमा न करता जर तुम्ही एखाद्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर तो तुम्हाला महागात पडू शकतो. पुण्यात अशाच एका बनावट प्रोफाईलमुळे महिलांची लाखोंची फसवणूक झाली आहे. नेमकं काय घडलंय? इस्त्रोचा वैज्ञानिक निघाला दहावी पास मजूर आहे. ‘लखोबा लोखंडे’कडून महिलांना लाखोंचा गंडा घातला आहे. मॅट्रिमोनिअल वेबसाईटद्वारे महिलांची फसवणूक केली. कसिनोच्या नादात महिलांच्या आयुष्याशी खेळ. सध्या खोटी माहिती देवून फसवण्याचे प्रकार वाढलेयेत. त्यामुळे कुणावरही पटकन विश्वास ठेवत असाल, तर सावधान.. पुण्यात मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर खोटी माहिती देवून महिलांच्या आयुष्याचा खेळ मांडणाऱ्या बनावट इस्त्रो सायंटिसचा भांडाफोड झाला आहे.  इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करतो असं म्हणून पुण्यातल्या एका दहावी पास मजुरानं अनेक जणींना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.

 

महत्त्वाचे मुद्दे 

आदर्श म्हात्रेची चार वेगवेगळी नावं

मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर ‘इस्त्रो सायंटिस्ट’ लिहिलेली बनावट प्रोफाईल

मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून महिलांशी संपर्क करायचा

महिलांना लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढायचा

विधवा आणि जास्त वय असलेल्या तरुणींना फसवायचा

भविष्यासाठी गुंतवणूक करू, असं सांगून लाखो रूपये घ्यायचा

गोव्यातल्या कसिनोमध्ये ते पैसे उधळायचा

कसिनोच्या नादापायी महिलांना फसवल्याचं उघड

आरोपीवर 11 गुन्हे दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *