अर्ज केल्यावर तीन तासात मिळणार पीएएफ?

भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) देशभरातील पाच कोटी पीएफ खातेधारकांसाठी ऑनलाईन पीएफ काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. मार्चअखेर अशी सुविधा उपलब्ध होणार असून या सुविधेमुळे पीएफसाठी अर्ज केल्यापासून अवघ्या तीन तासात पीएफची रक्कम बँकेत जमा होण्याची शक्‍यता आहे.

‘ऑनलाईन पीएफ सुविधेबाबत आम्ही याबाबत कामगार मंत्रालयाला कळविले आहे. आम्हाला आशा आहे की मार्च अखेरपर्यंत आम्ही अशी सुविधा देऊ‘, अशी माहिती केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनी दिली आहे. गुरुवारी कनिष्ठ न्यायालयाने मनेरगा, सेवानिवृत्तीच्या विविध योजना आणि भविष्यनिर्वाह निधीसारख्या शासकीय योजनांसाठी आधारक्रमांक ऐच्छिक करण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. सद्यस्थितीत पीएफ काढण्यासाठी ईपीएफओकडे प्रत्यक्ष अर्ज सादर करावे लागतात. अशा प्रकारची सुविधा देण्यासाठी काही परवानग्या आवश्‍यक असल्याचेही जालान यांनी पुढे सांगितले. सध्या पीएफसाठी अर्ज केल्यानंतर 20 दिवसांमध्ये पीएफ बॅंक खात्यात जमा करण्यात येतो. मात्र, आधार कार्ड क्रमांक दिला असल्यास अवघ्या तीन दिवसांमध्येही पीएफ जमा होतो, असेही जालान यांनी सांगितले. मात्र, ऑनलाईन सुविधेनंतर हा अवधी अवघ्या 3 तासांवर येणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *