विमान दुर्घटनेप्रकरणी मयत पायलट कशी बाजू मांडणार? CID चौकशीतील गोपनीय माहिती समोर

सीआयडी (CID) चौकशीदरम्यान, व्हिएसआर कंपनीचा मालक व्हि के सिंग यांनी विमान अपघात प्रकरणी सर्व जबाबदारी ही मयत पायलट सुमित कपूरवर ढकलल्याने अजित पवार यांच्या विमान अपघाताभोवतीचं संशयाचं धुकं आणखीनच गडद होऊ लागलं आहे. कारण, या आपल्यावरील आरोपांचा प्रतिवाद करायला तो हयातच नाहीये. म्हणूनच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

 

अजित पवार विमान अपघाताला पायलटच जबाबदार!!!

अजित पवार विमान अपघात प्रकरणी विमान कंपनीचा मालक व्हि के सिंह यांची सीआयडीने फक्त शुक्रवार नाहीतर शनिवारी देखील गोपनीयरित्या चौकशी केल्याचं समोर आलं. या चौकशीदरम्यान व्हि के सिंह यांला पुढील प्रमुख प्रश्न विचारण्यात आले.

CID चौकशीत व्हि के सिंगला कोणते प्रश्न विचारले गेले? 

  • विमान खरेदी नेमकी कोणाकडून कधी केली?
  • विमानाच्या दुरुस्तीचा म्हणजे मेंटेनन्स शेड्युल किती वेळा सर्विसिंग झाली?
  • सुमित कपूर याचा परवाना किती वेळा रद्द केला पुन्हा नूतनीकरण कधी केला कोणी केला ?
  • अपघाताच्या दिवशी त्याला ड्युटी कशी लावली कोणी लावली याची संपूर्ण माहिती

या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना व्हि के सिंह यांनी एकच पालूपद लावलं आणि ते म्हणजे या अपघातात आमच्या विमानात कोणताही तांत्रिक दोष नव्हता. ‘शेड्यूलनुसार ते त्या दिवशीही उड्डाणासाठी तांञिकदृष्ट्या तंदुरुस्तच होते. त्यामुळे काही उपघातावेळी काही चूक झाली असेल तर ती पायलटकडूनच झाली असेल त्यात कंपनीचा कोणताही दोष नाही,’ असा दावा व्ही के सिंह यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबात केला.

व्ही के सिंह याचा हा सीआयडी जबाब माध्यमातून समोर येताच मोठं वादंग उठलं. या जबाबावर सर्वात पहिलं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते रोहित पवारांनी. “व्हि के सिंह हा आता मयत पायलटला बळीचा बकरा करू पाहतोय…,” असा घणाघाती आरोप रोहित पवारांनी केला. व्ही के सिंह याच्या या जबाबावर फक्त पवार गटच प्रश्नचिन्ह उपस्थित करून थांबला नाही, तर इतर पक्षांच्या नेत्यांनीही अजित पवार विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नव्याने लावून धरली. ज्यामध्ये अमोल मिटकरींसह अंबादास दानवे, प्रकाश आबिटकर, सतेज पाटील यांचाही समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *