इराणमधील भयाण वास्तव! तेल डेपोंवरील हल्ल्यानंतर हवेत पसरलं विष;

अमेरिका- इस्रायलनं इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यांना एक नवं वळण मिळालं असून, एक असं युद्ध पेटलं आहे जे इतक्यात शमताना दिसत नसल्यानं यामध्ये सामान्य नागरिकच सर्वाधिक होरपळताना दिसत आहे. इराणकडूनही आखाती देशांना सातत्यानं निशाण्यावर घेतलं जात असून, या युद्धात हजारो बळी गेले आहेत. इराणवर होणाऱ्या भीषण हल्ल्यांमुळं इथं श्वास घेणंसुद्धा कठीण होताना दिसत आहे.

इस्रायली लष्करानं नुकतंच इराणच्या शाहरान आणि शाहर-ए-रे तेल डेपोवर भयंकर हल्ले केल्यानं त्याचा परिणाम आजुबाजूच्या एका मोठ्या भागावरही होताना दिसत आहे. या भागांमध्ये हल्ल्यानंतर प्रचंड प्रमाणात काळेकुट्ट ढग पसरले असून भर दिवसा अंधार दाटून येताना दिसत आहे, इतकंच नव्हे, तर आकाशातून बरसणाऱ्या पाऊसधारासुद्धा विषारी असल्यामुळं अराणवर नवं संकट ओढावल्याचं स्पष्ट होत आहे.

एका प्रतिष्ठीत माध्यमसमुहाच्या वृत्तानुसार इराणमध्ये असणाऱ्या काही भारतीय इराणी नागरिकांनी तेथील परिस्थितीबाबत नातलगांना माहिती दिली. इराणमधील सध्याचं वास्तव इतकं भयाण आहे की, इथं दिवस उजाडतो तोच धडकी भरवणाऱ्या परिस्थितीमध्ये. सकाळी 10 वाजतासुद्धा इथं अंधारच असतो. नागरिकांना श्वास घेणंही इथं कठीण आहे, अनेकांना इथं असह्य वाटत आहे. लहान मुलं, म्हातारी माणसं, पाळीव प्राणी सर्वांचाच श्वास इथं गुदमरतोय. इराणमध्ये तेल डोपेवर झालेल्या हल्ल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती ही अतिसय भयभीत करणारी असून, सध्या येथील नागरिकांची हतबलता काळजात धस्स करून जात आहे.

प्रचंड भयावह हल्ल्यानं जग सुन्न… 

भारतात वास्तव्यास असणाऱ्या एका इराणी नागरिकानं जेव्हा तेहरानमधील आपल्या कुटुंबाशी संपर्क साधला तेव्हा तेव्हा त्यांनी सरकारी नियंत्रण असणाऱ्या ‘बेल’ नावाच्या मेसेजिंग अॅपचा उल्लेख केला. हे युद्ध आता निसर्गावरही आघात करत असून, सर्वांसाठीच एक मोठा धोका निर्माण करताना दिसत आहे. रुग्णालयात रुग्ण असह्य वेदनांमध्ये आहेत, सामान्यांना इथं जगणंही कठीण होऊन बसलं आहे. इस्रायलच्या लष्करानं तेल डेपोवर केलेला हा हल्ला इतका भयंकर होता, ज्याची अपेक्षा खुद्द ट्रम्प प्रशासनालाही नव्हती. त्यामुळं हे संकट आता आणखी किती गडद होणार हाच चिंतातूर करणारा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *