पुणे मेट्रोमध्ये 8 मार्चपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागांची सुविधा

पुणे मेट्रोकडून महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार, दिनांक 8 मार्च 2026 पासून जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोच्या सर्व मेट्रो ट्रेनमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत.

वृद्ध नागरिक आणि महिला प्रवाशांची मोठी सोय

पुणे मेट्रोच्या ट्रेनमधील तीनही कोचेसमध्ये ही नवीन आसन व्यवस्था लागू करण्यात आली असून, यामुळे विशेषतः वृद्ध नागरिक आणि महिला प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. पुणे मेट्रोच्या ट्रेनमधील तीनही कोचेसमध्ये ही नवीन आसन व्यवस्था लागू करण्यात आली असून, यामुळे विशेषतः वृद्ध नागरिक आणि महिला प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

 

सध्या राखीव जागांचे नियोजन असे असेल :

कोच (डबा) महिलांसाठी राखीव जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागा
पहिला कोच (DMA Car) 14 02
मधला कोच (T-Car) 18 04
तिसरा कोच (DMB Car) 14 02
एकूण 46 08

 

महिला प्रवाशांसाठी 46 जागा, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 8 जागा

मेट्रोच्या प्रत्येक ट्रेन मध्ये महिला प्रवाशांसाठी 46 जागा, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 8 जागा राखीव  असणार आहेत. या आसन व्यवस्थेचा सविस्तर आराखडा (Drawing Layout) पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांवर आणि अधिकृत ॲपवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. मेट्रोच्या डब्यांमध्ये दर्शवलेल्या चिन्हांनुसार (Signage) राखीव जागा ओळखून त्यानुसारच बसण्याची विनंती प्रवाशांना करण्यात येत आहे. पुणे मेट्रो प्रवाशांना या राखीव जागांच्या नियमांचे पालन करण्याचे आणि सहप्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *