इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूनंतर सत्तासंरचनेत मोठी हालचाल सुरू झाली असून, या संभाव्य सत्तांतराच्या प्रक्रियेत अली लारिजानिणंची हे मध्यवर्ती महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याची चर्चा आहे. लारिजानी यांनी आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेत तीव्र भूमिका घेत म्हटले,“America and the Zionist regime have set the heart of the Iranian nation ablaze. We will burn their hearts…” “अमेरिका आणि झायनिस्ट शासनाने इराणी राष्ट्राच्या हृदयाला जाळवलं आहेत. आम्ही त्यांच्या हृदयालाही जाळून टाकू.”
या वक्तव्यानंतर इराणच्या पुढील राजकीय व लष्करी धोरणांबाबत त्यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत अली लारिजानी?
• इराणमधील ज्येष्ठ आणि प्रभावशाली राजकारणी
• माजी संसद अध्यक्ष
• सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे (SNSC) माजी सचिव
• अणुचर्चा आणि प्रादेशिक कूटनीती हाताळण्याचा अनुभव
• खामेनेई यांचे विश्वासू सल्लागार
सत्तेच्या सातत्यासाठी (regime continuity) आणि संभाव्य नव्या नेतृत्व व्यवस्थेसाठी लारिजानी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली गेल्याचे संकेत आहेत. अमेरिका-इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर, अंतर्गत स्थैर्य राखणे आणि बाह्य धोरण ठरवणे या दोन्ही आघाड्यांवर ते ‘की प्लेअर’ म्हणून पुढे येत आहेत. एकंदरीत, खामेनेईनंतरच्या इराणमध्ये सत्तासंतुलन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत अली लारिजानी यांचे महत्त्व लक्षणीय वाढले आहे.
अली लारिजानी कोण आहेत?
इराणमधील ज्येष्ठ आणि प्रभावशाली राजकीय नेते म्हणून ओळखले जाणारे अली लारिजानी सध्या इराणच्या सत्तासंरचनेत अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत असल्याचे मानले जाते. वाढत्या अमेरिका-इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणमध्ये संभाव्य सत्तांतर किंवा ‘रेजिम कंटिन्युइटी’च्या चर्चेत त्यांचे नाव पुढे येत आहे.
