भारतातील दुसरी वॉटर मेट्रो महाराष्ट्रात सुरु होणार; मुंबईत 5 स्टेशन

भारतातील दुसरी वॉटर मेट्रो महाराष्ट्रात सुरु होणार आहे.  डिसेंबरपासून मुंबईत बहुप्रतिक्षित वॉटर मेट्रो प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे बंदरे मंत्री नितेश राणे यांनी  हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबवला जाईल अशी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 एप्रिल 2023 रोजी केरळमधील कोची येथे भारतातील पहिली वॉटर मेट्रो सुरु झाली.

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पात बॅटरीवर चालणाऱ्या फेरी सुरू केली जाणार आहे. या वॉटर मेट्रोमुळे मुंबईची वाहतूक कोंडी कमी होणार आहे.  एमएमआरमधील वॉटर मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) 28 फेब्रुवारीपर्यंत सादर केला जाण्याची अपेक्षा आहे. वॉटर टॅक्सी प्रकल्पांतर्गत एमएमआरमध्ये सहा ते आठ मार्गांवर सेवा दिली जाणार आहे.  राज्य सरकारने एमएमआरमध्ये वॉटर टॅक्सी प्रकल्पांतर्गत सहा ते आठ मार्ग तयार केले आहेत, जे इलेक्ट्रिक बोटींच्या जाळ्याने जोडले जातील, ज्याचा अंदाजे खर्च 1,200 कोटी रुपये आहे. राणे म्हणाले की, केरळमधील कोची वॉटर मेट्रोप्रमाणेच, फडणवीस ६ मार्च रोजी होणाऱ्या राज्य अर्थसंकल्पात या प्रकल्पाची अधिकृत घोषणा करतील.

मुंबई वॉटर मेट्रो मार्ग

राज्य सरकारने जलवाहतुकीच्या नेटवर्कसाठी एमएमआरमध्ये सहा ते आठ मार्ग निश्चित केले आहेत.  त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन मार्ग सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुंबई शहरात, नरिमन पॉइंट-वरळी-वांद्रे-जुहू-वर्सोवा सारख्या जास्त रहदारी असलेल्या किनारी भागामध्ये ही वॉटर मेट्रो सुरु केली जाणार आहे.
दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील रेडिओ क्लब जेट्टी तयार केली जाणार आहे. येथे वॉटर मेट्रोचे प्रमुख जंक्शन असेल. येथून वॉटर मेट्रोने फक्त 40 मिनिटांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचता येणार आहे. या वॉटर मेट्रोतून एकाचवेळी 50 ते 150 प्रवासी प्रवास करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *