‘माझ्याशी बोल, नाहीतर फोटो मॉर्फ करून व्हायरल करीन’, तरुणीचा पाठलाग करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

राज्यात महिला आणि मुलीच्या सुरक्षेच्या प्रश्न वारंवार समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक विकृत तरुण हा शालेय तरुणाला रस्त्यात अडून सारखा विनयभंग करायचा, पीडितेला त्रास द्यायचा. अखेर वैतागून अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. आरोपी तरुणीचा विनयभंग करून तिला सोशल मीडियावर बदनामीची धमकी द्यायचा. त्यामुळे तिने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी आरोपी विरोधात सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. “माझ्याशी बोल, नाहीतर एआयचा वापर करून तुझे फोटो मॉर्फ करून व्हायरल करीन”, अशी धक्कादायक धमकी या नराधमाने तरुणीला दिली होती.

आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेते. आरोपी हा गेल्या डिसेंबर 2025 पासून या तरुणीचा सातत्याने पाठलाग करत होता. “तू मला आवडतेस, तू माझ्याशी का बोलत नाहीस?”, असे म्हणत त्याने वेळोवेळी तिची वाट अडवून विनयभंग केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *