24 तासांपासूनची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा प्रयत्न, घटनास्थळी दुसरा टँकर दाखल

 गेल्या 22 तासांपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरती वाहतूक विस्कळीत झाली आहे. या महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ एका टँकरचा अपघात झाला. हा टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी विस्कळीत झाली. या टँकरमधून अत्यंत ज्वलनशील मानला जाणारा प्रोपलीन गॅसची वाहतूक केली जात होती. टँकर उलटल्याने गॅसची गळती सुरु झाली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. अखेर सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. तेव्हापासून अनेक तासांपासून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. अनेक किमी दूरपर्यंत वाहनांचा लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. ही वाहतूक कोंडी कधी फुटेल? असा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे. या दरम्यान एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

आडोशी बोगद्याजवळ पलटी झालेल्या टँकरमधील गॅस ट्रान्सफर करण्यासाठी दुसरा टँकर घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे. गॅस ट्रान्सफर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. याआधीदेखील अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. पण त्यात प्रशासनाला यश आलं नव्हतं. अखेर घटनास्थळी दुसरा केमिकल टँकर आणण्यात आला आहे. या टँकरमध्ये आता गॅसचं ट्रान्सफर केलं जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *