हेअर क्लिप लागून मेंदूला जबर मार, 4 महिन्यांपासून अंथरुणाला खिळून; खारघरच्या श्रुतीला हवाय तुमच्या मदतीचा हात!

ऑगस्ट महिन्यात श्रुती रोहित जमदाडे पती रोहित जमदाडे यांच्यासोबत दुपारच्या दरम्यान एका कामानिमित्त घराबाहेर पडल्या. या दरम्यान पाऊस आणि जोराचा वारा येत होता. दुचाकीवर बसण्यापूर्वी श्रुती यांनी छत्री उघडण्याचा प्रयत्न केला असता वाऱ्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या.

या झालेल्या अपघातात श्रुती यांच्या डोक्याला त्यांच्या केसाचा क्लिप लागला. यावेळी मेंदूला झालेल्या जबर दुखापतीत त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या काही तासांत क्रॉन्युटॉमी ही सर्जरी करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर श्रुती चार दिवसांनी शुध्दीत आल्या. पण यामध्ये फक्त बोटांनी हालचाल झाली.

यानंतर गेल्या 5 महिन्यांपासून श्रुती बेशुद्धा अवस्थेतच आहेत. या दरम्यान त्यांना असंख्य  शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागलं. यामध्ये फुफ्फुसांचं इन्फेक्शन झालं. त्यानंतरही त्यांची एक सर्जरी झाली. आतापर्यंत श्रुती यांच्यावरील उपचारासाठी  9 लाखांहून अधिक खर्च झाला आहे. पुढील उपचारासाठी रोहित आणि श्रुती यांना मदतीची गरज आहे.

पतीची सावली सारखी साथ 

रोहित जमदाडे गेली 5 महिने श्रुतीसोबत सावलीसारखे आहेत. श्रुतीच्या प्रत्येक क्षणाला रोहितची खंबीर साथ आहे.  लग्नात दिलेल्या वचनांना रोहित तंतोतंत निभावत आहे. रोहितने आपली नोकरी सोडली असून त्यांनी श्रुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित यांनी आतापर्यंत श्रुतीची सर्व सुश्रृषा केली आहे. श्रुतीच्या या खडतर प्रवासात रोहितची खंबीर साथ आहे. डॉक्टरांनी अद्याप काहीही स्पष्टपणे सांगत नसले तरीही रोहित यांचा पूर्णविश्वास आहे की, श्रुती या परिस्थितीवर मात करुन लवकर बरी होईल.

पुढील उपाचारासाठी श्रुती यांना पुर्नवसन केंद्रात न्यायचे आहे. यासाठी त्यांना मदतीची गरज आहे. मदतीसीठी खालील क्रमांकावर तुम्ही मदत करु शकता. खालील क्रमांकावर तुम्ही श्रुती यांना मदत करु शकता. आपल्याला जोडीदाराला अशी साथ देणं खूप मोठी गोष्ट आहे.

रोहित जमदाडे – 81083 94484
श्रुती जमदाडे –  8169298182

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *