‘आप चुनाव हार रहे हो’, निकालाआधीच उबाठा उमेदवारांना अज्ञात नंबरवरून मेसेज; नगरपरिषद निकालात फेरफार?

महाराष्ट्रात 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषद निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर झाला. राज्यात  ठिकठिाकाणाहून निवडणूक आणि निकालासंबंधित अनेक बातम्या समोर येत आहेत. दरम्यान अकोला जिल्ह्यातील तेल्हार तालुक्यातील महिला उमेदवार शिवानी थाटे यांनी ई. व्ही. एम मशीनमध्ये फेरफार झाल्याची तक्रार नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

निकालाआधीच उबाठा उमेदवारांना अज्ञात नंबरवरून मेसेज…

नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उबाठा (UBT) गट आणि काँग्रेस तसेच नगर सेवा समिती या आघाडी तर्फे निवडणुकांसाठी रिंगणात उतरलेल्या शिवानी  थाटे यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून काही व्हॉट्सअप मेसेज आले होते. त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे, शिवानी यांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर निवडणूक निकालाच्या दिवशी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी इंग्रजीत ‘हाय’ असा मेसेज आला होता. त्यानंतर 10 वाजून 36 मिनिटांनी त्याच क्रमांकावरून ‘आप चुनाव हार रहे हो’ असा मेसेज आला, तर 10 वाजून 43 मिनिटांनी ‘941 व्होटोसे’ असा मेसेज आला. हे मेसेज 22 डिसेंबर 2025 रोजी शिवानी थाटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर लगेचच याबाबत स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली.

नगरपरिषद निकालात फेरफार?

दरम्यान माहितीनुसार, शिवानी थाटे यांना ज्या अज्ञात मोबाईल क्रमांकावरून सदर मेसेज आले होते त्याच्या प्रोफाईल फोटोमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्यासह कोट घातलेला एक इसम दिसत होता. तसेच प्रोफाईलवर साकेतकुमार पि.एस. टु होममिनिस्टर असे नाव दिसत होते. दरम्यान शिवानी आणि विजयी उमेदवार याच्या मतांमध्ये 1242 मतांचा फरक होता. मेसेजमध्ये निकालाबाबत वर्तविलेला अंदाज हा 941 मतांचा होता.

विशिष्ट राजकीय पक्षाचा गैरकायदेशीर फायदा करून देण्याच्या हेतू…

तेल्हारा नगरपरिषद निवडणूकीच्या महिला उमेदवार शिवानी थाटे यांनी एका विशिष्ट राजकीय पक्षाने एका विशिष्ट राजकीय पक्षाचा गैरकायदेशीर फायदा करून देण्याच्या हेतूने ई.व्ही.एम मशीनमध्ये हेरफेर केली या संशयाने ही तक्रार नोंदवली आहे. तसेच तक्रारीची तात्काळ दखल घेऊन अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याची आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यामागे दडलेले राजकीय शडयंत्र जनतेसमोर उघड करण्याची मागणी केली आहे.

बृहन्मुंबई महापालिका निवडणूका…

दरम्यान, नगरपरिषद निवडणूका झाल्यानंतर आता पुढील वर्षी बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणूकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार  याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *