छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची चौदावी पिढी म्हणजेच उदयनराजे भोसले यांची धाकटी कन्या नयनताराराजे यांच्या हस्ते प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात चांदिचे मेघडमरु देऊन देवीचं पूजन करण्यात आलं. उदयनराजेंची धाकटी कन्या नयनताराराजे भोसले आतापर्यंत सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या नव्हत्या. मात्र, या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या आज सर्वांच्या समोर आल्या.
विविध कारणामुळे कयम चर्चेत असणारे आणि छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज छत्रपती उदनयराजे भोसले यांची धाकटी कन्या नयनतारा राजे भोसले यांच्या हस्ते प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात चांदिचा तब्बल दिडशे किलोचा मेघडमरु देण्यात आला. या वेळी देवीची पुजाही त्यांच्याच हस्ते करण्यात आली. या मेघडमरुवरची कला-कुसर अप्रतिम असुन ही कलाकारी पहाताक्षणी ती डोळ्यात भरते. हा मेघडमरु बनवण्यासाठी पुण्यातील दिग्गज कलाकारांना गडावर आणण्यात आले होते. ज्या डिझाईन आवडल्या नाहीत, त्या पुन्हा् वितळवुन बनवण्यात आल्या.
छत्रपती उदयनराजे भोसले यांना आठ वर्षांचा विरप्रतापसिंह राजे आणि पाच वर्षांची नयनताराराजे अशी दोन मुलं आहेत. ही मुलं बाहेर गावी असल्यामुळे ती कोणाच्याच समोर आली नव्हती. उदयनराजेंची कन्या् नयनताराजे या प्रतापगडावर येणार कळल्यावर अनेकांनी गडावर गर्दी केली होती. नयनताराराजे यांच्या हस्ते पुजन झाल्यानंतर त्यांना तलवारी दानपट्टा मशालीच प्रात्याक्षिक दाखवण्यात आली.

